फुटबॉल प्रशिक्षक एआयएफएफ डी लायसन्स सर्टिफिकेट कोर्स संपन्न

aiff-d-certificate-course

कोल्हापूर स्पोर्ट्‌स्‌ असोसिएशनच्या वतीने व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन यांच्या मार्गदर्शनानुसार फुटबॉल प्रशिक्षक यांच्यासाठीचा एआयएफएफ डी लायसन्स सर्टिफिकेट कोर्स नुकताच दि. 23-04-2022 रोजी संपन्न झाला. हा कोर्स न्यू पॅलेसच्या पोलो ग्राऊंड व के.एस.ए.च्या छत्रपती शाहू स्टेडियम येथे घेणेत आला. फुटबॉल खेळाचा प्रसार सर्वत्र होणेसाठी उत्तम प्रशिक्षक निर्माण करणेच्या दृष्टिकोनातून या प्रशिक्षणाचे आयोजन एआयएफएफ, न्यू दिल्ली यांच्यामार्फत करणेत येते. श्री मालोजीराजे छत्रपती,अध्यक्ष, के.एस.ए. व व्हा. प्रेसिडेंट, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन, मुंबई, मा.सौ. मधुरिमाराजे छत्रपती, महिला समिती सदस्या, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन व महिला समिती चेअरमन, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन, मुंबई यांच्या विशेष प्रयत्नातून कोल्हापूरात हा कोर्सचे आयोजन करणेत आले. यापूर्वी या कोर्सच्या दोन बॅच झालेल्या असून आज कोल्हापूरात डी लायसन्सचे एकूण 72 प्रशिक्षक आहेत.

या कोर्ससाठी कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 24 प्रशिक्षकांनी समावेश होता. त्यामध्ये 6 महिला व 18 पुरूष यांचा समावेश होता. या कोर्ससाठीचे मुख्य प्रशिक्षक श्री. प्रशांत सिंग यांनी प्रशिक्षण अभ्यासक्रमाची माहिती दिली. त्यामध्ये रोल ऑफ कोच, कम्युनिकेशन, वॉर्म अप, बॉल फिलींग, ड्रिब्लींग, बॉल कंट्रोल, ऍटॅकींग, गोल कीपींग, पास ऍण्ड सपोर्ट प्ले, डीफेंडींग, फ्लॅनिंग ऑफ सेशन, मेथड्‌स्‌ ऑफ कोचिंग, प्रिन्सीपल्स्‌ ऑफ प्ले, एज स्पेसिफिक ट्रेनिंग, इनज्यूरी प्रिवेंटेशन ऍण्ड मॅनेजमेंट, हायजिन, स्पोर्ट्‌स्‌ सेप्टी ऍण्ड इनज्यूरी प्रिवेंटेशन, लॉज ऑफ दि गेम इत्यादि बाबतचे व्हिडिओज्‌, थेरी व मैदानावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक यांचे प्रशिक्षण देणेत आलेे. यामुळे फुटबॉल खेळाडूंच्या खेळामध्ये आधुनिकरितीने तंत्रशुद्ध विकास होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन प्रशिक्षक यांना मिळाले आहे.

श्री मालोजीराजे छत्रपती यांनी कोर्सचे प्रशिक्षक प्रशांत सिंग यांचा पुष्प गुच्छ व शाल देऊन सत्कार केला. यावेळी मा.सौ. मधुरिमाराजे छत्रपती, सचिव श्री. माणिक मंडलिक, सहसचिव श्री. राजेंद्र दळवी, सदस्य श्री.दिपक घोडके उपस्थित होते. प्रशिक्षक श्री. प्रशांत सिंग यांनी कोल्हापूरातील खेळाडूंच्यामध्ये असलेल्या टॅलेंटचा व प्रशिक्षणाचा विशेष उल्लेख करून भविष्यातील या खेळाच्या प्रसारासाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र हायस्कूलने केलेल्या सहकार्याबद्दल क्रीडा प्रशिक्षक श्री. प्रदीप साळोखे व त्यांच्या खेळाडूंचे के.एस.ए.च्या वतीने विशेष आभार मानले.