के.एस.ए. अध्यक्ष श्री. मालोजीराजे छत्रपती व पेट्रन-स.सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांचा वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्कार

वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 12 ऑक्टोबर, 2022 रोजी कुपरेज फुटबॉल ग्राऊंड, मुंबई येथे मा.अध्यक्ष श्री.प्रफुलभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेसाठी व्हा.प्रेसिडेंट्स्श्री. हरिष वोरा, श्री. विश्र्वजीत कदम, श्री. मालोजीराजे छत्रपती, श्री. अदित्य ठाकरे व जनरल सेक्रेटरी-श्री. साऊटर वाझ, ट्रेझर्र-श्री. प्यारेलाल चौधरी, असि.सेक्रेटरीज्व कार्यकारिणी सदस्य तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्हा असोसिएशनचे अधिकृत प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये के.एस.ए.ऑन.जनरल सेक्रेटरी श्री. माणिक मंडलिक, ऑन.जॉईंट जनरल सेक्रेटरी-श्री. राजेंद्र दळवी हे उपस्थित होते. या सभेमध्ये के.एस.ए. अध्यक्ष श्री. मालोजीराजे छत्रपती यांची ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या विशेष महत्त्त्व असलेल्या फायनान्स समितीवर उपाध्यक्षपदी, स्पर्धा समीतीवर सदस्यपदी याचबरोबर 17 वर्षाखालील मुली जागतीक फुटबॉल स्पर्धेच्या अंतर्गत महाराष्ट्रात होणाऱ्या सामन्यांसाठी एआयएफएफचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून निवड झालेबद्दल तसेच के.एस.ए.च्या पेट्रन-स.सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांची ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या महिला समिती सदस्या म्हणून सलग दुसऱ्यांदा निवड झालेबद्दल वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे मा.अध्यक्ष-श्री. प्रफुलभाई पटेल यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व महाराष्ट्राच्या फुटबॉल क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी पदाधिकारी- व्हा.प्रेसिडेंट्स्श्री. हरिष वोरा, श्री. विश्र्वजीत कदम, श्री. मालोजीराजे छत्रपती, श्री. अदित्य ठाकरे व जनरल सेक्रेटरी-श्री. साऊटर वाझ, ट्रेझर्र-श्री. प्यारेलाल चौधरी, असि.सेक्रेटरीज्व कार्यकारिणी सदस्य व जिल्हा असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.