वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन यांच्यावतीने महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा महिला फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा दिनांक: 20 ते 25 फेब्रुवारी, 2020 या कालावधीत जळगांव येथे घेण्यात येणार आहे. सदर स्पर्धेसाठी कोल्हापूर स्पोर्ट्स्असोसिएशनच्या वतीने के.एस.ए. कोल्हापूर जिल्हा महिला फुटबॉल संघ पाठविणेसाठी निवड चाचणी व प्रशिक्षण शिबीर दि. 10 ते 18 फेब्रुवारी, 2020 या कालावधीत छत्रपती शाहू स्टेडियम येथे घेण्यात आले. केएसएचे ऑन.फुटबॉल सेक्रेटरी व एन.आय.एस.कोच-प्रा. अमर सासने व कोच श्री.सुर्यदीप माने यांनी प्रशिक्षण शिबीरातील खेळाडूंना तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले. जळगांव येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा महिला फुटबॉल अजिंक्यपदासाठी के.एस.ए. कोल्हापूर जिल्हा महिला फुटबॉल संघ रवाना झाला. संघातील खेळाडूंची नांवे:
पृथ्वी लालासाहेब गायकवाड(कर्णधार), मृणाल रघुनाथ खोत(उपकर्णधार), साक्षी श्रीकांत जाधव(गोलकीपर), सोनाली जयवंत साळवी, प्रियांका चंद्रकांत मोरे, पौर्णिमा श्रीकांत साळे, अधिका तातोबा भोसले, ज्योति शिवाजी ढेरे, पूनम भिमराव मिठारी. प्रतिक्षा संजय मिठारी, भक्ती प्रकाश पवार, ऋतुजा दिनकर सुर्यवंशी, सरस्वती जंबुवंत माळी, प्रतिक्षा तुकाराम चांदणे, आरती तुकाराम औताडे, कोमल सुरेश पाटोळे. या संघाचे प्रशिक्षक म्हणून-श्री.सुर्यदीप प्रफुल्ल माने व व्यवस्थापक म्हणून श्री. प्रियांका गवळी हे कामकाज पाहतील.
या संघास ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन महिला समिती सदस्या व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन, महिला समिती चेअरमन सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांनी संघास यशस्वी कामगिरी करणेसाठी शुभेच्छा दिल्या. श्री. माणिक मंडलिक(सचिव), प्रा. अमर सासने(फुटबॉल सेक्रेटरी), श्री. संभाजीराव पाटील-मांगोरे उपस्थित होते.संघास संस्थेचे पेट्रन्इन-चीफ श्री शाहू छत्रपती महाराज व पेट्रन्मेंबर- खासदार युवराज श्री संभाजीराजे छत्रपती, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व के.एस.ए.चे अध्यक्ष- श्री मालोजीराजे छत्रपती यांचे प्रोत्साहन लाभलेसंघाचा पहिला सामना दि.21-02-2020 रोजी अकोला जिल्हा महिला फुटबॉल संघाबरोबर होणार आहे.